STORYMIRROR

Usha Khandagale

Inspirational

3  

Usha Khandagale

Inspirational

आनाथांचा वाली

आनाथांचा वाली

1 min
213

झाली आयुष्याची लक्तर

प्रवास जगण्याचा खडतर

अनाथांच्या जिवणामंदी

तिनं पेरले रे अत्तर. !!१!!


होती जगण्याची भ्रांत

श्वास कोंडला मुखात

पाणी टाकून पिठात

बळ ढकलल पोटात !!२!!


किती छळलं जगण्यानं

जसं मरण ही घाबरलं

वेदना अंतरीच्या सोसत

तिनं स्वतः ला सावरलं !!३!!


किती जिवांना आधार

दिला माय माऊलीनं

लढा अन्यायाविरुद्ध

तिनं दिला निकरानं. !!४!!


झाली अनाथांची माय

त्यांना मिळाला हा वाली

श्रीमंत मनाची झोळी

कधी राहिली नाही खाली !!५!!


उच्च होते विचार 

तिचे साधे सुधे रहाणे

ध्येय होते मोठे तिचे

मागे वळून न पहाणे !!६!!


तोफ धडकली विदेशी

तिचा देशात ही डंका

विदेशी फाडकवली तिनं

महाराष्ट्राची पताका !!७!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational