आम्ही शहीद
आम्ही शहीद
स्वातंत्र्य हा यज्ञ असे हा
बलिदानाच्या आहुती हो
याच यज्ञाच्या पूर्तीसाठी
चढलो फासावरती हो //
नरक यातना भोगून अनंत
संपले कित्येक वीर हो
माय भु च्या सन्मानासाठी
वाहिला हा जीव हो //
सिंचुन रक्त युध्दसमयी
मायभुचे केले रक्षण हो
भाग्य या जन्माचे झाले
बनलो स्वतांत्र्यवीर हो //
जान असुद्या त्यागाची आमच्या
नका म्हणू नुसते शहीद हो
नका देउ तिलांजली कशाला ?
सांभाळा आपला देश हो //
हुतात्म्य स्मृरुनी साधत जा
नेहमी देश हित हो
मायभूस बनवा बलशाली
जसा आजिंक्य कोट हो //
वंदे मातरम् .........शहीद अमर रहे //