STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

आम्ही साथी

आम्ही साथी

1 min
1.1K


सारे आम्ही साथी असूनी साह्य करू दिनराती,

संकटांचा महाकाय पर्वत खोदून काढू,

आम्ही साथी सारे......

सोपे असो कठीन असोत या दिव्यपताका,

अलगद उचले भार हा संसाराचा,

मिळूनी मिसळून समाधानाने

कष्टातही हसूनी जगावे खरे,

आम्ही साथी सारे...

प्रयत्नांती परमेश्वर ही मिळतोय

आकाशातीत ग्रहावर जावूनी येतोय

मिळूनी सारी क्षृद्र रसायनाची सृष्टी

दिसतेय निरर्थक वस्तू,

पंरतू कृती विज्ञानाची भारी

जगसंचालनाला कसा हातभार लावी......

आम्ही साथी सारे.......

जोडगोळीने सुख दुःखाचे ओलांडूनीया डोंगर

पृथ्विवासी एकमेका देवू साथ आम्ही,

मनुष्य जन्म हा लाभतो भाग्याने

कश्याला संसारात मग मागे राहाणे....

आम्ही साथी सारे.......

तेजस्वी रवी किरणांची सहस्त्र वलये तिमिरावरी ही मात करी,

अज्ञानाच्या या भग्न कृतीला ठेचूनी,

समाजास देवूया समृद्ध रंग

साथीने आम्ही सारे.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational