आम्ही दूषित
आम्ही दूषित
कधी मनात येतो सवाल ?
आम्ही का तो दूषित घाट ?
कुणी वासनेच्या भरात
चुर होऊन भंगले मला...
म्हणून
की या स्त्रीच्या स्त्रीत्वाचा
उपभोग समाज बाह्य होता..
म्हणून
बरोबर कदाचित तसेच आहे..
कुणा स्त्रीला वाटेल
हे श्रापित आयुष्य मिळावं..
जिथं रोज वासनेचा
तो नरपिशाच्च लचके तोडायला
सज्ज झालेला असतो..
म्हणून आज रोज सरास
कुठे ना कुठे बलात्कार होतात..
एक खुशाल आयुष्य श्रापित होत..
येथे खरतर आमचंच चुकतं
आम्ही स्त्रिया
जिजाऊ नाही होऊ शकलो..
शिवाजी, संभाजी पुन्हा नाही
येथे घडवू शकलो ..
नाही आम्हाला वेश्या
म्हणून धुतकारलं असतं का ?
आज मन माझ्या दोन्ही
छत्रपतीना हाक मारत..
राजे कुठं आहे तुम्ही ?
पुन्हा या आम्हाला मुक्त करा..
पुन्हा या आम्हाला मुक्त करा..
