आमचे राजे (पोवाडा)
आमचे राजे (पोवाडा)
#SMboss#Task4
शिवाजी आमुचे राजे | शूरवीर प्रतापी राजे ||
समाज सुधारक राजे | कर्तव्य दक्ष राजे ||
सर्वगुण संपन्न राजे | प्रेरणादायी योद्धा असे आमचे राजे ||
"अशीच आमुची आई असती सुंदर,
आम्ही सुंदर झालो असतो" | वदले होते शिव छत्रपती ||
परस्त्रीला मातेचा दर्जा त्यांनी दिला |
खणा नारळाची ओटी भरून पाठविली ||
स्त्री विषयी आदराचे धोरण |
अगदी रक्तात भिनलेले असे आमचे राजे ||
मराठी अस्मिता | स्वकर्तृत्वावर निर्माण केली||
स्वराज्याचे स्वप्न | सत्यात घडविले ||
प्रत्येकाच्या ह्रुदयात | राजे विराजमान झाले ||
युगपुरुषाचे नाव इतिहासाच्या | पानांवर कोरले गेले असे आमचे राजे ||
कदापि असा राजा | पुन्हा होणे शक्य नाही||
राजं तुमच्या विचारांची | नितांत गरज आहे||
हे राष्ट्र पुन्हा शिवमय व्हावं | अन् आमचे राजे तुम्ही आमच्या संरक्षणासाठी यावं ||
