आमचा बळीराजा...
आमचा बळीराजा...
आमचा बळीराजा नरकचतुर्दशी आज,
पहिल्या आंघाेळीचा मानाचा हा साज...
आमचा बळीराजा नरकासुरावर वार,
श्रीकृष्णाने या दिवशी केला राक्षसाचा संहार...
आमचा बळीराजा नवीन धान्याची रास,
टाकताे आनंदात भर विविध फराळांचा वास...
आमचा बळीराजा जपताे कृषीसंस्कृतीची प्रथा,
जाणून घ्या या दिवशी आमच्या अंतरीच्या व्यथा...
