STORYMIRROR

AnjalI Butley

Classics

1  

AnjalI Butley

Classics

आमच ब्रँडींग आम्हालाच करायच

आमच ब्रँडींग आम्हालाच करायच

1 min
429


खुप दिवसांनी शाळेच्या मैत्रिणी भेटल्या होत्या

गप्पा गोष्टींत रंगल्या होत्या हास्याच्या गडगडात 


शाळेत मोठे झाल्यावर काय होणार विचारल्यावर

'शाळेच्या बाई' हे खास उत्तर दिलेल्याचीही आठवण झाली


झालो आम्ही 'शाळेच्या बाई' 

खंत त्यांनी व्यक्त केली


शिकवण्या पेक्षा आता आमचा वेळ 

जास्त खर्च होतो ब्रँडींग साठी


कार्यक्रम झाल्या झाल्या 

फोटो सकट बातमी तयार ठेवायची


सोशल मिडियावर अपलोड करत

लाईक्स, कॉमेंटसच अकाऊंटही सांभाळायच


सतत आपल मेक अप मध्ये वावरायच

कामा पेक्षा फोटो कसे छान असणार ह्यावरच सगळा भार असतो


अग काय सांगु तुम्हाला 

आपल्या सर्व बाई मेकअप विना कश्या छान दिसायच्या


छान मन लावुन शिकवण्याच 

नव्हत्या करत ब्रँडीग स्वतः


विद्यार्थीच असायचे त्यांचे ब्रँडींग करत

आजही 'शाळेच्या बाईं' ना असतो आदर


पण आमचे तसे नाही...

आमचे व शाळेचे ब्रँडींग स्वतःलाच करायच असत...


आमच ब्रँडींग आम्हालाच करायच असतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics