आली दिवाळी
आली दिवाळी
चिल्या - पाल्याना कपडालत्ता
बायकोलाही घे बघ साडी
मान्य आहे मला दादा
गरिबीत पिचलेला संसार तुझा
सालाबदाप्रमाणं ती तर येणारच
गरीब असो की श्रीमंत
ऐपत असेल नसेल पण
ती तुझा जीव घेणारच
ह्यांचे टोमणे , मुलांचा हट्ट
मी सगळं सगळं करीनच मॅनेज
लांड लटक का होईना म्हण दादा
ताई तुला भाऊबीजेला घ्यायला येऊ का ?
नको साडी नको मला काही
पोटापुरते तर आहेच मलाही
नको रुसवे -फुगवे ...
आनंदाने कर साजरी दिवाळी
