STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

4  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Inspirational

आले आभाळ भरून

आले आभाळ भरून

1 min
415

धरा तृषार्त तापली

आले आभाळ भरून

कृष्ण मेघ धावताती

आली वीज कडाडून


बरसती सरी सरी

धरा गंधित बावरी

डोलतात तृणांकुर

रम्य हिरव्या शिवारी


कंच ओली हिरवाई

नवी नवाई गात्रात

नवे सृजन अंकुरे

धरित्रीच्या गे गर्भात


भागे तृषा चातकाची

नाचे मोर थुई थुई

शोभे निळ्या आसमंती

इंद्रधनू छान बाई


सृष्टी जाहली सुस्नात

बघा वाहती ओहोळ

तिच्या लावण्य रूपाचे

मनी दाटती मोहोळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational