आला पुन्हा हा मार्च महिना
आला पुन्हा हा मार्च महिना
आला पुन्हा हा मार्च महिना
आठवतोय ना पहिला लाँकडाऊन
शुकशुकाट रस्त्यावरी
तितकीच शांतता अंतरी...
खिडकीतून नजरेनं
आजुबाजुची खबर घ्यावी..
दारापुढचे महानगरपालिकाचे बँनर
धस्स काळजात होई,
कोण बरे कोरोनाग्रस्त असेल
हुरहूर मनास भेडसावी...
रोजचे येणारे दिसेनासे झाले
वर्तमानपत्र, दूधवाले,भाजीवाले
बाजारातही जाण्या निर्बंध आले...
मोकळा श्वास घ्यायला
चौकटीतले मन कन्हु लागले..
सांगा आता कसं जगायचं,
आला पुन्हा हा मार्च महिना
सावट भितीचं घेऊन
जलद गती पकडून..
आता,मात्र खूप झालं
जनजीवन विस्कळीत झालं
कोरोनानं सर्वसामान्याला
चहुबाजूंनी बदडलं...
आला पुन्हा हा मार्च महिना
बघा,आता कसं करायचं
त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करावी
की शिकावं काही जुन्यातून
काळजी घ्या सर्वांनी स्वतःची
ओघाओघाने... समाजाची
विनंती हिच काळजातून...
