STORYMIRROR

Sharad Kawathekar

Abstract Classics Others

3  

Sharad Kawathekar

Abstract Classics Others

आला गेला

आला गेला

1 min
152

तो आला

आज तो जरा वेगळ्याच मुडमध्ये होता 

तो थांबण्यासाठी नव्हता आला

तो आला

तो बिलगत राहिला 

सलगी करत राहिला 

धसमुसळेपणा करत राहिला 

सुसाट वा-यासारखा

स्वतः बहरत राहिला

पारिजातका सारखा

आणि अचानकपणे

तो शांत झाला

तो बोलत नव्हता 

पण ओठ थरथरत होते 

स्वतःला जपणा-या ज्योतीसारखं

तो आला ...

पण मी या कश्यातच नव्हतो

तो आला

तो गेलाही

क्षणभर पापण्या ओल्या झाल्या 

काळजात श्वास काळजातच कोंदला

श्वासाचा कोंडमारा झाला

उन्हातली स्वप्नं सावलीत संपली

तो आला आणि तो गेला

मी मात्र .....

तो गेलेल्या वाटेकडंच बघत राहीलो

तो नजरेआड होईपर्यंत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract