आक्रोश
आक्रोश
डोळ्यात बंदिस्त क्षणाचा,
मनास त्रास होत आहे,
सांजही टाळुन जाते मजला,
हा आक्रोश मरण देत आहे...
काय? हिरावुन नेलेस तु,
काय? दिसत तुला आहे,
मी जिंवत आहे ऐवढेच,
तेवढेच माझ्यात उरले आहे...
हसणे रडणे रुसणे फुगणे,
कधीचे हिरावले आहे,
भाव ना भावना मनात,
तरीही युद्ध सुरु आहे...
मौन हे मौनापरी नाही,
ही शांतताही भयाण आहे,
सहवासात येईल जो कळेल,
अजूनही निखारा तापुन आहे...
