STORYMIRROR

Sailee Rane

Tragedy

4  

Sailee Rane

Tragedy

आजी आजोबा

आजी आजोबा

1 min
1.1K

खरंच का ओ आजी आजोबा

मोठी झाल्यावर माणसे बदलतात

लहानपणी प्रिय असलेले आईबाबा

त्यांच्या म्हातारपणी मात्र ओझ्यासारखे वाटतात


ज्या बाबांनी आणलेल्या खाऊसाठी

लहानपणी ते वाट पाहत असतात

तेच बाबा म्हातारे झाल्यावर मात्र

त्यांची विचारपूसही करायला विसरतात ।।1।।


आजीच्या हातचे चमचमीत आवडीने खाणारे बाबा

आई आल्यावर मात्र त्या चवीला विसरतात

चविष्ट जेवण करण्याला आजीला मात्र

मध्येमध्ये लुडबुड नको करुस असे सांगतात।।2।।


आजी आजोबांशी गप्पात रंगणारे आईबाबा

आता आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात

एकटे एकटे बसलेल्या माझ्या आजीआजोबांकडे मात्र

पूर्णपणे दुर्लक्षच करतात।।3। 


आईबाबा जसे तुम्ही घडलात तसे आम्हालाही घडायचंय

तुम्ही वेळ देत नसलेल्या आजीआजोबांशी

आम्हाला मात्र खूप गप्पा मारायच्यात आणि

करायची गट्टी त्या दोन जिवांशी।।4।।


आम्हालाही व्हायचंय संस्कारक्षम अन् आज्ञाकारी

त्यासाठीच हवेत आम्हाला आमचे आजीआजोबा

आज एकच सांगते तुम्हा साऱ्यांना

आम्हाला हवेत आमचे आजीआजोबा।।5।।


आम्हालाही ऐकायच्या आहेत त्या पऱ्यांच्या गोष्टी

आम्हालाही झोपायचंय त्यांच्या मायेच्या ऊबेत

नाही हा आईबाबा आता नाही ऐकणार

आजीआजोबा आमचे आता हवेच आहेत घरात।।6।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy