STORYMIRROR

Savita Kale

Tragedy

4  

Savita Kale

Tragedy

आजच्या काळापुढील प्रश्न

आजच्या काळापुढील प्रश्न

1 min
392

अपमानित होत आहे आज ती पदोपदी

छळणारे कौरव नि लज्जित पांडव आहे

रक्षणा धावा करी आज इथे द्रोपदी

हरवला कुठे तो श्रीकृष्ण पाहे


परस्री मातेसमान तो एक काळ होता

शिवबाच्या तलवारीचा धाक तो काय होता

आज स्वाभिमान तिचा तुडविला जात आहे

बोथट तलवार झाली, गंजत ती जात आहे


निर्दयी होऊनी कळ्या आज तोडिती

फुलणयाआधी त्यास कसे हो चिरडती

मानवाच्या भावना आज सा-या भग्न आहे

चिमुकलीच्या सुरक्षेचा गहन असा प्रश्न आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy