STORYMIRROR

Kshitija Bapat

Tragedy

4  

Kshitija Bapat

Tragedy

आजच्या काळापुढील प्रश्न

आजच्या काळापुढील प्रश्न

1 min
416

पाखरे उडाली परदेशात

सोडून सर्व मोह पाश

परदेशात मांडले ठिकान

विसरून गेले आई बाप


पैशाच्या आवेशात

कर्तव्याला मुकली

संबंध तोडून

परदेशात कायमची बसली


आजचा काळापुढील प्रश्न

मुले आपल्या व्यापात मग्न

वृद्धाश्रमांत जन्मदात्या चे ठिकाण

पैसे पाठवून मिळवतात मान


आई-वडील वाटतात ओझी

त्यांच्यासाठी ठेवल्या दासी

तरीही ते उपाशी

प्रेमा विना आतुरलेली


थकलेले त्यांचे डोळे

सुरकुतल्या हातात काठी

वाट पाहता तुझी

केव्हा होतील भेटीगाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy