आजची स्त्री(नीरजा रचना)
आजची स्त्री(नीरजा रचना)
आजची स्त्री (नीरजा रचना)
चूल आणि मूल
संपला जमाना
पुरातन
रूढीवादी
करून संघर्ष
बांधले प्रगतीचे पूल
घेतला तिने वसा
गाजवले कर्तृत्व
खंबीर
निर्भय
राहून सदा
उमटवला जगी ठसा
उघडली दालने नवी
स्वबळावर घेतली
उत्तुंग
भरारी
एकविसाव्या शतकी
पोवाडे गाती कवी
आहे ती सबला
या युगातील
महत्त्वाकांक्षी
क्रांतीज्योत
लेक सावित्रीची
नसे ती अबला
