आजची नारी
आजची नारी
लय भारी आजची नारी,
कमी नाही आम्ही कारभारी
नाही मानत ती कशातच हार,
उचलू शकते नवऱ्याचाही भार
समजू नका आम्हाला कोणी कमी,
सर्वांच्याच उपयोगी पडतो आम्ही
लय भारी आजची नारी,
कमी नाही आम्ही कारभारी
प्रत्येक क्षेत्रात आमचीच आघाडी,
दाखवून देऊ करणाऱ्यास बिघाडी
जमीन, पाणी, आकाशातही आमचीच हवा,
कोठे कमी पडतो ते आम्हास दावा
लय भारी आजची नारी,
कमी नाही आम्ही कारभारी
शत्रूलाही आम्ही पुरुन उरु,
वाकड्या नजरेने पाहणाऱ्यास धरून मारू
तुम्ही राखाल आमचा मान,
तर आम्ही वाढवू तुमची शान
लय भारी आजची नारी,
कमी नाही आम्ही कारभारी
