आजचे शिक्षण
आजचे शिक्षण
पाटी पेन्सिल
नावापुरतीच हाय
समदयांना संगणका
विना गत्यंतर नाय
गणकयंत्राची किमया
लय भारी हाय
पाढे पाठांतराची
गरजच नाय
आकडेमोडची चिंता
मिटली हाय
घोकमपट्टी
राहिलीच नाय
गुरुजींचा बाईंचा
धाक कुठं हाय
छडीने मारायचा
विषयच नाय
डोनेशनच फॅड
समदीकडं हाय
गोरगरीबांचा घास
राहिलाच नाय
शिक्षणाच वय
सहा वर्षे हाय
तिन वर्षात मुलं
शाळेत घालयच नाय
शिक्षणाचा बाजार
मांडला हाय
शिक्षण हा संस्कार
उरलाच नाय
विकतचं शिक्षण
आजकाल हाय
फुकटचं देशात
राहिलेच नाय
