STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational Others

4  

Bharati Sawant

Inspirational Others

आजचा विषय - जाणता राजा

आजचा विषय - जाणता राजा

1 min
316

सोळाव्या शतकात शिवनेरीगडावर

वैशाख शुद्ध द्वितियेच्या त्या तिथीला

जिजाऊच्या पोटी सुपुत्र हो निपजला

गडावर शिवाईदेवीने शुभ कौल दिला


बालपणीच युद्धाचे प्रशिक्षण द्यायला

तत्पर दादोजी कोंडदेव यांसारखे गुरु  

मासाहेबांच्या करड्या शिस्तीखाली 

दांडपट्टा भालाफेक शिकणे झाले सुरू


घेवुन रायरेश्वरापुढे स्वराज्याची आण

चौदाव्या वर्षी तोरणाकिल्ला केला सर

जमवुन शिवाजीने मुठभर मावळ्यांना

छूप्या गनिमांना पळवून लावले दूरवर


रयतेला गडकिल्ल्यांचे दिले संरक्षण तंत्र

स्थापना केली मराठी हिंदवी स्वराज्याची

छत्रपतींचा मुकूट चढवून शिवरायांनी डोई

स्वप्नपूर्ती केली आऊंच्या सुखी सुराज्याची


देऊनी मानइज्जत साऱ्या आयाबहिणींना

जपले तयांच्या शील आणि चारित्र्याला

सैन्यातील शिपायांना देऊनी योग्य तनखे 

त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्नही सोडवला 

    

रायगडावर पार पाडला आनंदात

सोहळा शिवाजी राज्याभिषेकाचा

गागाभट्टांनी उच्चारिले संस्कृत मंत्र

शिवाजीराजांच्या शौर्य नि गौरवाचा


असा न्यायी राजा पुन्हा होणे नाही

त्रिवार वंदन माझ्या मराठी राजाला

विनंती प्रत्येक मातेची परमेश्वराला

शिवरायांसारखा पुत्र यावा पोटाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational