STORYMIRROR

Pratik Kamble

Tragedy Inspirational

1  

Pratik Kamble

Tragedy Inspirational

आज मला प्रश्न पडतो

आज मला प्रश्न पडतो

1 min
2.6K


आज मला एक प्रश्न पडतो 

किती त्रास होत असेल तिला

किंचाळत ओरडत रडतपडत

कळा सोचाव्या लागतात तिला

हौस हौस करून त्यांची हौस 

अजुन पर्यंत भागली नाही

झाकली मुठ सव्वा लाखाची 

ती मुठ कधी छाकलीच नाही

सदा उघडीच राहिली ती मुठ

अब्रु तिची भर रस्त्यावर मांडली

सोन्यासारखे जीवन तिचे आता

का रे तिची अब्रु वेशीवर टागली

जगता जगता जगतात सगळे

पण त्याला सुध्दा मार्ग असतो

बाईच्या अब्रुला तो हरामखोर 

उघड्यावर कवडीमोलात विकतो 

रस्ता चार रस्ती असो किंवा पाच

सरळ मार्गाने जायला हवे

आदर महिलांचा करून आपणास

समाजाला बदलायला हवे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy