STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Tragedy Classics

3  

Ganesh G Shivlad

Tragedy Classics

आज काहीच नाही

आज काहीच नाही

1 min
1K

सुचत नाही, काय लिहू,

काहीच कसं कळत नाही..!

फुल म्हणू की म्हणू कळी,

आज काहीच कसं उमजत नाही..!


परी म्हणू की म्हणू पाखरू,

काहीच कसं उडत नाही..!

थंडी म्हणू की म्हणू गर्मी,

आज वाराही कसा वाहत नाही..!


वृक्ष म्हणू की म्हणू वेल,

तिथे फुल कसले ना पान नाही..!

ना पाऊस ना ऋतू ना मौसम,

आज बागेतही कसा वसंत नाही..!


काय झाले, काय माहीत,

शब्द ही कसे भेटत नाही..!

रुसली का माझी कविता माझ्यावर,

आज मनात कसं काहीच नाही..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy