STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract

आज भरली शाळा..

आज भरली शाळा..

1 min
399

काय सांगू मला

किती आनंद झाला,

आज भरली शाळा

भेटले गुरुजी मला...


लई दिवसांनं

लई नवसानं,

सारेच माझे मित्र

आज भेटले मला...


शाळेत सारे चला

चला शिकायला,

शिक्षणाचं महत्त्व

आज कळलं मला...


विद्या गुरूविना मिळेना कुणा,

वंदू,पुजू सारे आज आपल्या गुरूंला...


गुरू माय बाप

गुरू देव रुप,

गुरू विन विद्या

कशी मिळेल कुणाला...


सुरु झाली शाळा

लागो शाळेचा लळा,

शाळेविना गुरुजी

करमेना आम्हाला...


घेऊ ज्ञानाचे धडे

शिकून जावू पुढे,

पुढे नेवू मिळून सारे

या भारत मातेला...


शाळेत आनंद

नको शाळा बंद,

गुरुजी तुमचं दर्शन

हवं रोज आम्हाला...


आज शाळा सुरू झाली

मुले शाळेत ही आली,

आनंद गगनात मावेना

कसं सांगू मी जगाला...


आजवर प्रत्येक दिवस

शाळेसाठी केलं नवस,

शाळा सुरू झाली

देव पावला नवसाला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract