आईविना पोर
आईविना पोर
कसा जगू आईविना
सांग तू रे परमेश्वरा
मार्ग काढा यातूनी
तूच माझा सखा सोयरा ||१||
आईविना पोर
झाली सारी बिचारी
अशी कशी रे ओढवली
या निष्पापांवर लाचारी ||२||
आईच्या अनुपस्थितीत
मांडू व्यथा कुणाकडे
आई नको हिरावून घेऊ
परमेश्वरा घालतो तुला साकडे ||३||
एक विनंती करतो परमेश्वरा
कुणा पोरा ठेवू नको आईविना
एक दिवस येई परिस्थिती अशी
होईल साऱ्या पोरांची दैना ||४||
