STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

आईची थोरवी

आईची थोरवी

1 min
230

जादूगार आहे आई किंमत जादूची करता येत नाही 

नऊ महिने संरक्षण बाळाला पोटात तिच्या जागा ओझ्याचा त्रास असला तरीनाही करत ती त्रागा 

आई आहे दैवी शक्ती करू तिची चरणसेवाआशीर्वादाचा गवसेल मेवा 

तिच्या कुशीत असतो सुगंधी वाळा ओठी तिच्या प्रार्थना सुखी ठेव बाळा 

कुटुंबासाठी जणू ती सुरूचे झाड उभ्या आयुष्यात कष्ट करून मोडून जाते तिचे हाड 

त्याची नाही तिला पर्वातिच्या उतरत्या वयात प्रेमाने तिला घास भरवा 

पायाखाली ठेवा मऊमऊ चादर उशी नवलाईने म्हणावे वाटतं आई ग तु अशी ग कशी 

सुक्या मेव्यातील तु एक चारोळी ठेच लागता मुखी येते आईगं अशी आरोळी 

लागली ठेच होते विस्मरण तुझ्याशिवाय जगणं म्हणजे जिवंत मरण 

उपकार तुझे केले मला मोठे बोट धरून माझ्यासाठी आई तू का गं रहात नाही चिरतरुण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational