आईची आरती
आईची आरती
आई तुझी आरती...
मी गातो,आई तुझी आरती ..२
गेलीस सोडून जरी आम्हा तू
डोळ्यासमोर तुझीच मुर्ती...!!
अश्रू डोळ्यातून लागले वाहू
कुठे शोधू तुला, कुठे मी पाहू...२
शोधण्यास तुला जगभर माझी
नजर भिरभिरती...!!
रोज तुझी आठवण येते ग आई
कंठ माझा हा दाटून येई ..२
कोसळले आभाळ आम्हावर आई
फाटली ही धरती...!!
रोज तुझी मी ओवी गाई
जन्मोजन्मी मज हवी स तू आई..२
किती लाड तू केलीस आई
किती उपकार आम्हावरती...!!
तुला मी पुजतो, तुला मी धजतो
कोटी कोटी वंदन तुला मी करतो..२
टेकवितो माथा शतदा मी आई
तुझ्या चरणावरती...!!
दुःख मला रोज होते ग आई
छत्र तुझे आई, आम्हावर नाही..२
तुझे आशिर्वाद जन्मभर आई
असो आम्हावरती...!!
