STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Inspirational

3  

Prashant Tribhuwan

Inspirational

आईचे लाल

आईचे लाल

1 min
333


मातृदिनाची आज होईल कमाल

जागे होतील सारे आईचे लाल


जिने शिकविले बोटाला धरून चाल

शेवटी साथ सोडतील आईचे लाल


जिने जपले जीवनभर बनून ढाल

घाव तिच्यावर घालतील आईचे लाल


मिळाला जिच्यामुळे राहायला महाल

धाडतील वृद्धाश्रमात तिलाच आईचे लाल

 

जरी करून मोकळी ती सर्वकाही बहाल

काय दिले म्हणोनी विचारतील आईचे लाल


ज्यांच्यासाठी सोसले तिने इतके हाल

काय केले आमच्यासाठी विचारतील आईचे लाल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational