आईच प्रेम
आईच प्रेम
प्रियसीच प्रेम आम्हाला पदोपदी मिळतं,
पण त्या आईच प्रेम कुणाला कळतं ?
तिच्या प्रत्येक दुःखात
उभा राहतो तिच्या पाठीशी,
पण हे विसरून जातो
कोणी शिकवलं चालायचं धरून बोटाशी!
तिने विचारले जेवलास का?
तर ऊर भरून येतं,
पण हे विसरून जातो
ते जेवण कोण करून देतं!
तिचे चोचले पुरवण्याच्या
नादात होऊन जातो हिन-दीन,
पण हे विसरून जातो
कोणी काढलं याच्यासाठी रीन!
तिच्या प्रत्येक सुखदुःखात
हा होतो काळजीपूर्वक सहभागी,
पण हे विसरून जातो
कोण झाले याच्यासाठी सर्व सुखाचे त्यागी!
तिला दुःख झाले तर
याच्या जिव्हारी लागते,
पण हे विसरून जातो
याच्या दुःखात कोण जागते!
ती जवळ नसली की
याचा कासाविस होतो जीव,
पण हे विसरून जातो
कोण करते याची हरघडी कीव!
तिच्या आठवणीत झुरून
जेव्हा लागतो जाऊ तोल,
पण हे विसरून जातो
तेव्हा कोण देते सात्वणाचे बोल !
