आई
आई
आई विना जगी भिकारी
आईस आर्त हाक मारी
आई विना मज कोण तारी
आई विना नाती फिकी सारी
आई विना देवदैवत नाही
आईच आहे देवता माझी
आई विना दुजे जगी न काही
क्षणोक्षणी आठवण तुझी
आई विना जीवन नाही
आईच आहे शिल्पकार
आई विना वात्सल्य नाही
आई खरा जीवनाचा सार
आई विना पोरके सारे
आई करे माया ममता
आई विना जगी प्रेम नाही
आईच माझी माता पिता
आई विना घरटे सुने
घरट्यात चिमणी पाखरंV
आई विना घास कोण घाली
आईच ठेवे सुखी संसार
