आई
आई
नको रडू बाळा
लाभे आईचा सहवास
तुझ्या संगे जागते
लई रात्र दिवस
तुझ्या रडण्याने बाळा
घेई तुला आई
तिच्या दुधाचे अमृत
तुला पाजण्यास देई
तुझ्या हसण्याने
होई आईला आनंद
तिचे हृदय जपते
तुझ्यातला छंद
भावना कळते आईला
काळजीने सांभाळते
तिची नि:स्वार्थ माया
तुला काळजात जपते
नाजूक तिचे मन
हळव्या संवेदना
तुझ्या स्पर्शाने जाते
मिटून सगळ्या वेदना
