STORYMIRROR

Shashikant Shandile

Inspirational

2  

Shashikant Shandile

Inspirational

आई तुझ्या दुधाला

आई तुझ्या दुधाला

2 mins
13.9K


आई तुझ्या दुधाला कसलेच मोल नाही

गाळले तू घाम जे रक्त म्हणवले नाही

ममतेची तुझी छाया फेकून रस्त्यावरती

रक्ताला तुझ्या आता गरज तुझीच नाही

आई तुझ्या दुधाला ..

पाजुनी रक्त केले लाडाने मोठे ज्याला

होऊनी तोच मोठा शहाणा आज झाला

नवरी चार दिसाची वैरिण आई झाली

घरी सून येता ममतेस विटाळ झाला

आई तुझ्या दुधाला ..

किंमत दुधाची विसरुन तो भाळला रुपाला

म्हणताच बायकोने लात मारली घराला

केले होते मुलावर अन्याय का मातेने

पाठवली मरता खेपी आई वृद्धाश्रमाला

आई तुझ्या दुधाला .

आईने का करावी मरमर मुलांसाठी

म्हातारपणी मुलांची ती आस कश्यासाठी

भेटीत जेव्हा अश्रू मिळणार त्या आईला

आईने का करावा सांभाळ रडण्यासाठी

आई तुझ्या दुधाला ..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational