STORYMIRROR

प्रविण कावणकर

Abstract

3  

प्रविण कावणकर

Abstract

आई सालबाई देवी

आई सालबाई देवी

1 min
453

नवे रूप घेऊनी प्रकट झालीस उपकार तुझे लाभले

तुझ्या स्थापनेने सालबाई देवी आवडीने नाव घेतले


गावची शान सुख दुःखाना सामोरे जाऊन पडावी सावली

सदैव पाठीशी खबीरपणे उभी असलेली माझी माऊली


कृपा तुझी लाभली आम्हावरी नतमस्तक होऊन चरणी

सजून नटली कला गुणांनी सालबाई देवी आमच्याअंगी


नवरात्रीचा सण हा रंगला आशिर्वादाने क्षण आनंदाचा

तुझ्या दरबारी सोहळा भरला दांडिया खेळ नृत्याचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract