Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shivani Hanegaonkar

Inspirational

4.3  

Shivani Hanegaonkar

Inspirational

आई काय असते जरा जाणून तर बघ...

आई काय असते जरा जाणून तर बघ...

1 min
265


आई का असते जरा जाणून तर बघ

एक गाण तिच्यासाठी जरा गावून तर बघ ॥धृ॥


घरातल्या घरात भिरभिरणारा वारा असते आई

घरामध्येच सामावल्या असतात तिच्या दिशा दाही

तुझे पंख हे तिचेच असतात जरा उडून तर बघ

 एक गाण तिच्यासाठी जरा गावून तर बघ....॥१॥


दिवे जरी मालावले तरी आई असते जळत

मनातल्या मनात घराचे दळण दळत

एक चपाती तिच्यासाठी लाटून तर बघ

एक गाण तिच्यासाठी जरा गावून तर बघ.....॥२॥


कधी येतो पाऊस कधी असते ऊन

आई जवळ नसतो कधी विसाव्याचा क्षण

चालत असते ती जन्मभर जरा थांबून तर बघ

एक गाण तिच्यासाठी जरा गावून तर बघ.....॥३॥


आईच्या अश्रुचे ढग बनतात

ती वात्सल्याचा सागर जणू

असशील खरा पुरूष रे जरा आई होवून तर बघ

एक गाण तिच्यासाठी जरा गावून तर बघ....॥४॥


जिंकण्यासाठी जग सर्वांनाच असते घाई

लागताच ठेच मात्र फक्त आठवते आई

ती हसत असते तुझ्यासाठी जरा तिच्यासाठी

रडून तर बघ

एक गाण तिच्यासाठी जरा गावून तर बघ....॥५॥


आई काय असते जरा जाणून तर बघ.....

आई काय असते जरा जाणून तर बघ.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational