आई - बाबा
आई - बाबा
काय काय नव्हतं केलं
आई-बाबांनी माझ्यासाठी
सारी भूक हरवून
दिवस काढलं होतं उपाशीपोटी
रक्ताचं पाणी केलं होतं
हाडांची काड केली होती
उसवून आयुष्य स्वतःच
माझी स्वप्न पूर्ण केली होती
आयुष्य सरलं त्यांचं
माझ आयुष्य बनवण्यासाठी
प्रत्येक क्षण हरवला त्यांनी
माझ्या आनंदी क्षणांसाठी
आता वेळ आली आहे
त्याच्या परतफेडीची
करत आहे तयारी उमतावण्या
लकर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची
फिटणार नाही पांग तुमचे
जन्मोजन्मी म्हणून
प्रत्येक वेळी
जन्म मिळावा तुमच्या पोटी
