STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy

3  

Supriya Devkar

Tragedy

आघात

आघात

1 min
346

एक स्त्री म्हणून तिला  कोणी कसही बघाव

तिला पायदळी तुडवत कोणी कसही निघाव


किती वेदना द्याल तिला 

नाही का हक्क जगण्याचा 

डिवचून शरीर हि पडत लुळं

नाही का हक्क शांत मरण्याचा


खेळणं बनून खेळवायला तिला 

कुठे गेली हो तुमची मानुसकी 

निर्विकार लक्तर तोडताना तिची

हरवली कुठे तुमची आपुलकी 


विवस्त्रतेत तिच्या हसता तुम्ही 

झापडे लावून डोळ्यांवर 

आघात किती कराल सदा 

तिच्या निष्पाप मनावर


डोळ्यावरली पट्टी काढून 

वर्तमानात जगा तुम्ही 

भावविश्व तिचे अनोखे 

वेळीच ओळखावे तुम्ही 


तिच्या सोबत जगताना 

तिला ही आता जगू द्या 

निर्भीडपणे सार्यांसोबत 

तिला ही आता वागू द्या 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy