Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Inspirational

4  

Manisha Awekar

Inspirational

आदर्श संविधान

आदर्श संविधान

1 min
387


भारताचे संविधान , डॉ. आंबेडकरांनी लिहिले

भारतमातेच्या शिरी , शिरपेचचि खोविले    (1)


स्वातंत्र्योत्तर काळात , सर्वसमावेशकता

अवघडचि काम होते , लिहिणे अशी संहिता   (2)


विद्वान , ज्ञानी , व्यासंगी , कीर्ती असे साहेबांची

समतोलपणे लिहिली , रचना संविधानाची   (3)


मुलभूत हक्कांचे , विवेचन यात केले

कर्तव्यांची बाजूही , नमूद केली असे    (4)


राज्यसरकार नि केंद्रशासन , व्यवस्थापनाचे

कायदे नमूद केले , संविधानामधे लोकशाहीचे (5)


राष्ट्रपती , उपराष्ट्रपती , पंतप्रधान , नियम नियुक्तीचे

कलमांमध्ये नमूद केले , ह्यांच्या  निकष पात्रतेचे  (6)


तळागाळातील लोकांचांही , सहानुभूतीने विचार केला

राखीव जागा ठेवून , तयांच्या विकासास वाव दिला  (7)


अनेकविध बाजूंचा , बहुपेडी विचार , दूरदृष्टीने केला

भारतीय नागरिक वंदितो , भारतीय संविधानाला  (8)


भारतीय नागरिकांनी संविधानासी , हक्काने मान द्यावा

पालन करुनी संविधानाचे , कर्तव्यास अग्रक्रम द्यावा  (9)


अनंत उपकार संविधान कर्त्यांचे , मानिले भारतीयांनी

उपकार मनी स्मरताचि , ऊर येई अभिमानाने भरुनी  (10)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational