STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational

4  

Priti Dabade

Inspirational

आदर

आदर

1 min
213

आदर मोठ्यांचा

आदर लहानांचा

आदर आप्तांचा

आदर नात्यांचा


आदर इतरांच्या भावनेचा

आदर करा मनाचा

आदर इच्छांचा

आदर करा स्वाभिमानाचा


आदर स्त्री शक्तीचा

आदर एखाद्याच्या भक्तीचा

आदर नितीमत्तेचा

आदर प्रेमरुपी सक्तीचा 


आदर शब्दांचा

आदर आश्वासनांचा

आदर बदलाचा

आदर मतांचा


आदर धर्मांचा

आदर रक्ताचा

आदर माणुसकीचा

आदर एकजुटीचा


आदर कामाचा

आदर निष्ठेचा

आदर प्रामाणिकपणाचा

आदर वेळेचा


आदर विचारांचा

आदर स्वभावाचा

आदर वागणुकीचा

आदर जडणघडणीचा


आदर मूल्यांचा

आदर संस्कृतीचा

आदर परंपरेचा

आदर संस्कारांचा


आदर पैशांचा

आदर प्रेरणेचा

आदर सत्तेचा

आदर खुर्चीचा


आदर प्राणीमात्रांचा

आदर पाण्याचा

आदर झाडांचा

आदर नैसर्गिक संपत्तीचा


आदर मेहनतीचा

आदर शेतकऱ्यांचा

आदर अन्नाचा

आदर कष्टांचा


आदर आयुष्याचा

आदर प्रेमाचा

आदर आपुलकीचा

आदर मायेचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational