आधारवड
आधारवड
आजी आजोबा गेल्यापासून
सारे काही हरविले
शोधायला गेले तरी
काही नाही सापडले ॥1॥
धान्य पाखडाया गेलो
सूपच सापडले नाही
पाट्यावरचा वरवंटा
पेलवतच नाही॥2॥
खूप बोलावसं वाटत
ऐकायला कुणीच नाही
आठवणीतला मामाचा गाव
आता स्वप्नातसुद्धा येत नाही॥3॥
सुखदुःखाच्या आठवणींनी
आता अंतःकरण होतं जड
कसा उन्मळून पडलाय हो
आमचा आधारवड॥4॥
