Priti Dabade

Romance


3  

Priti Dabade

Romance


आभास

आभास

1 min 156 1 min 156

वाऱ्याच्या झुळूकेच्या स्पर्शाने

जाणवत होता तुझा आभास

मनी रुखरूख होती

लाभेल कधी तुझा सहवास


आरशात पाहिलं की वाटतं

तू हळूच मागून मिठी मारली

तुझी वाट पाहण्यात रात्र

सारी सरून गेली


तू नसताना तुझं दिसणं

हळूच माझं स्वतःशीच हसणं

तुला कुशीत घेऊन बिलगणं

सारंच कसं स्वप्नासारखं वाटणं


नेहमीच तुझा मला

का भास होतो

आठवणींचा पसारा

मनात घर करतो


Rate this content
Log in

More marathi poem from Priti Dabade

Similar marathi poem from Romance