STORYMIRROR

vanita shinde

Inspirational

3  

vanita shinde

Inspirational

५२आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

५२आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

1 min
222

सोबतीने जायचे शाळेला

घेऊन ओझे दप्तराचे,

गंमती जंमती वाटेवरच्या

येऊन आईला सांगायचे.


मन भोळे खट्याळ भारी

स्वच्छंदी जीवन अल्लड,

काढूनी खोड्या रे नटखट

फिरते होऊन जसे उनाड.


धाक अन् आदर गुरुंचा

माहिती अभ्यास सत्रांची,

पुस्तकांची होते ओळख

जमते गट्टी ती मित्रांची.


परिक्षेची वाटते भिती

निकालाला मन आतूर,

पास आहे की नापास

नुसतीच वाटते रे हूरहूर.


रोज हजर होऊनी दारी

सवंगड्यांची येते स्वारी,

शाळेतील मजाच न्यारी

जीवन घडण्याची ती दोरी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational