STORYMIRROR

vanita shinde

Inspirational

3  

vanita shinde

Inspirational

५२ आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेस

५२ आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेस

1 min
161


एकाकी होता जीवन प्रवास

नव्हती कधी कुणाची साथ,

आयुष्य वाटायचे जेव्हा उदास

तेव्हा तू हाती, घेतलास हात.


जन्मोजन्मी साथ देण्याचे

वचनही मजला, तू दिलेस,

सुख दु:खांचे सोबती होत

मनात अलवार घर केलेस.


निराश होऊनी खचताना

धीर देऊनी, तू आवरलेस,

ओंजळ भरुनी मजवरी

आनंद सुमनांना उधळलेस.


नाही भासू दिलीस कधी

कसली उणीव, तू मजला,

तुझ्या सहवासानेच खरा

अर्थ जीवनास, या लाभला.


रुक्ष जीवनात येऊन तूच

रखरखणारे मन सावरलेस,

प्रित सुमनांचा वर्षाव करुनी

हृदय माझे, तू जिंकलेस.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational