२२-२-२२
२२-२-२२
दोना वर दोन
दिवस बावीस
महीनाही दोन
वर्ष हे बावीस
वीसावर दोन
सन ही बावीस
दोन हे नयन
घेती हो दर्शन
दोन हात माझे
करीती नमन
दोन दोन कान
करीती श्रवण
दोन हे चरण
होई चलनवलन
दोन नाकपुड्या
करीती श्वसन
धमन्याही दोन
रोहिणी नीला
मस्तकात दोन
मोठा नी लहान
आकाशात दोन
मून आणि सन
भागता दोनाने
हृदयात एका
जाई द्वैत हे संपून
उरे परमेश एक
