दव
दव
रम्य सकाळ ती बेहोशी,
धुके पिलेल्या नदीकाठी,
सहस्त्ररश्मीच्या मंडपात
खगांच्या गुंजनकाष्टकात,
किती तू बावरलीस
धुक्याच्या आंतरपाटात...
फेऱ्यागणिक उमटणारे तरंग,
अन् साक्षात नभीचेच रंग,
खुलले तुझ्याच सर्वांग,
अन सरता तो अंतरपाट,
प्रेम, दैव, भाग्य यांनाही,
वाटावा हेवा,
असा परिणय असा थाट...
दवांच्या साक्षिच्या त्या शपथा,
अन् मोरपिशी स्पर्शाने मोहरलेला,
गूलाबाचा गर्द लाल घट,
टोचावा एक काटा अन् तुटावा
स्वप्नांचा ताटवा, सारंच हरवावं,
मी दिड्मूढ तसाच
डोळ्यांतून ओघळले दव तेवढं खरं...

