स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
जहाँ डाल डाल पर सोनेकी
चिडियाँ करती है बसेरा
वो भारत देश है मेरा
असा आपला भारत देश समृद्ध होता म्हणुनच आधी पोर्तुगीज आणि ब्रिटिश व्यापार करायला आले. ब्रिटिश तर व्यापारी म्हणुन आले आणि राज्यकर्तेच झाले.
20मे 1498 ला वास्को द गामा ने समुद्रातून जलमार्ग तयार केला आणि भारत युरोप खंडातील देशांचे व्यापाराचे आकर्षण बनले.ब्रिटिश सर्वप्रथम सुरत मध्ये व्यापारच्या निमित्ताने आले.24 ऑगस्ट 1608 ला सर्वप्रथम सुरत इथे व्यापार केल्यानंतर ब्रिटिशांना तिथल्या राजा ने फॅक्टरी स्थापन करण्याची परवानगी दिली आणि त्याचवेळी विजयनगर येथील मुस्लिपटनम इथेही ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्याची परवानगी मिळाली. मुख्यतः त्यांनी व्यापार कलकत्ता, मुंबई, मद्रास इथे सुरु केला.असेच हळूहळू सर्व भारतभर व्यापार पसरवला . ह्यात मुख्यतः सिल्क, कॉटन, निळ, मसाले ह्यांचा समावेश होता.भारतातून कच्चा माल विकत घेणे आणि पक्का माल भारतीयांचं स्वस्त दरात विकणे हा त्यांचा व्यवसाय होता.
हळूहळू ब्रिटिशांनी भारतीय राजकारणात ढवळाढवळ करण्यास सुरवात केली.रॉबर्ट क्लाईव्ह ह्याने 1757 च्या प्लासी च्या लढाईत बंगालचा नवाब सिराज उद दौलाहचा पराभव केला अश्याप्रकारे हळूहळू राज्य खालसा करून भारतीय राज्यकारभार स्वतःच्या हातात घेतला आणि भारतीय जनतेवर अन्याय करण्यास सुरवात केली. शेतकऱ्यांवर अनाठायी कर लादून त्यांना पाहिजे तीच पीक घेण्यास प्रवृत्त केले जसे युरोप मध्ये निळ ला मागणी असल्यामुळे तेच पीक घेण्यास भाग पाडत आणि निळाचे पीक घेतले कि जमीन ओसाड बनत होती आणि त्यामुळे दुसरे पीक त्यांना घेता येत नव्हते तसेच शेतकऱ्यावर वाटेल ते कर लादून कर भरण्यास असमर्थ असल्यास जमिनी स्वतःच्या ताब्यात घेत.कच्चा माल स्वस्त दरात निर्यात करून कपड्याच्या मिल काढून स्वस्त कपडे विकत.त्यामुळे हातमाग कारागीरचा व्यवसाय बुडाला. अश्याप्रकारे ब्रिटिशांनी अन्याय केले.
शेवटी हा अन्याय सहन न होऊन अनेक भारतीयांनी पुढाकार घेऊन भारतीयांमध्ये ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाची जाणीव करून देऊन स्वातंत्र्य लढ्यात पुढाकार घेतला. त्यात लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सावरकर इत्यादीचा समावेश होता. विविध स्वातंत्र्यवीरांच्या पुढाकाराने आणि प्राणाची आहुती देऊन 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले. म्हणजेच ह्यावर्षी आपण सुवर्णं उत्सव साजरा करणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे तसेच जगात भारताला अव्वल दर्जावर पोहचविण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयांवर आहे. तर एकजुटीने ती जबाबदारी आपण पार पाडू या. भारताला स्वच्छ सुंदर बनवू या.. गड किल्यांचे संरक्षण करू या. आपली संस्कृती जपू या. विकासाच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल उचलू या. रोजगाराच्या संधी इथेच निर्माण करू या आणि उच्च शिक्षण घेऊन विदेशात न जाता भारतातच प्रगतीच्या वाटा निर्माण करू या. हीच प्रतिज्ञा सर्वानी मिळून ह्या सुवर्णं महोत्सवच्या दृष्टीने करणे अपेक्षित आहे..
जय हिंद.. जय भारत..
