आमचा कोको
आमचा कोको
कोविड पंडेमिक , लॉकडाउन ह्या सर्व परिस्थितीचा सामना करणे 21मार्च 2020 पासून सुरूच आहे. मुलांची शाळा बंद, ऑफिस बंद त्यामुळे सर्व घरीच आहेत आणि बाहेर खेळनेही मुलांचे बंद त्यामुळे सहाजिकच त्यांचा स्क्रीन टाइम वाढला आणि दिवसभर काय करावे हा प्रश्न आहेच आणि त्यात माझा मुलगा सध्या बारा वर्षाचा असून आठवीत शिकतो आणि त्याचे वय ना धड मोठा अन ना धड छोटा असे आहे. त्यामुळे आई बाबा जे सांगतील ते जास्त न ऐकण्याचे त्याचे वय. ऑनलाईन शाळेत एव्हडे लक्षही देत नाही. रोज अर्ध्या तासाच्या वर अभ्यासाला बसत ही नाही..मुलगी बारावीत ती तिच्या अभ्यासात गुंतलेली असते आणि ती मुलापेक्षा समजूतदार असल्याने तिनी परिस्थिती शी जुळवून घेतले पण मुलगा मात्र एक एक demand करू लागला कधी एक्स बॉक्स दे. कधी गेमिंग कॉम्पुटर दे अश्या रोजच्या demand चालतात. शेवटी घरचाच डेस्कटॉप upgrade करून दिला. काही दिवस खुप खुश होता पण स्क्रीन टाइम इतका वाढला की आम्हाला भिती वाटायला लागली मग आम्ही त्याला ओरडलो की मला कुणीतरी interactive पाहिजे अशी demand करू लागला आपण कुत्रा किंवा मांजर आणु या म्हणून मागे लागला..पण मला कुत्रा मांजर अश्या पाळीव प्राण्यांची मला खुप भिती वाटते. ते प्राणी अंगावर जरी आले तरी माझा थरकाप उडतो. मी जोराने कानावर हात देऊन किंचाळून उडी मारते आणि डोळे बंदकरून चेहरा वाकडा तिकडा करते इतका प्रचंड फोबिया मला आहे तसे तर मला बऱ्याच गोष्टींचा फोबिया आहे जसे बंद जागेचा, उंचीचा, उजवीकडे वाहन चालवीण्याचा, लिफ्ट मध्ये अडकण्याचा हा भाग वेगळा आहे मी त्यावर परत कधी तरी लिहणार आहे. पण कुत्रा किंवा मांजर आणण्याचे म्हटल्यावर मी मुलाला सांगितले की एक तर मी घरात राहील नाहीतर पेट पण तो काही केल्या ऐकायला तयार नव्हता. आमच्या एका फॅमिली फ्रेंड नी मांजर पाळली
ते ऐकून तिचे व्हिडिओ बघून तो अधिकच हट्ट करू लागला कुत्रा राहू दे पण मांजर तरी आणु या. मग मी लग्ना आधी अकोल्याला जमिनीवरच्या घरात राहत असल्यामुळे मला आठवले की मांजर बरेचदा घरात येते घरभर फिरून निघून जाते. मग त्याचा हट्ट बघून अहो ही म्हटले बाहेर परिस्थिती खराब आहे आणून देऊ या ह्याला मांजर मग मी माझी मानसिक तयारी करून तयार झाले आणि मग मांजरीची शोध मोहीम सुरु झाली.आधी सोसायटी मध्ये मांजरी येतात त्यानी कुठे पिल्लं दिली का हे शोधले. ते शोधून काढन्यासाठी सोसायटी च्या सेक्युरिटी गार्ड्स ला सांगितले लक्ष ठेवा कुठे मांजरीने पिल्लू दिले तर नाहीतर तुमच्या घराजवळ असेल तर आम्हाला आणून द्या. तसेच जवळच्या लोकांनाही सांगितले जर तुमच्याकडे मांजरीचे पिल्लं असल्यास कळवा.आणि काही मित्रानी adoption centre of pets बद्दल सांगितले. Adoption centre ने एक दोन black कलरचे मांजरीचे पिल्लू पण ते कुणाला आवडले नाही. नंतर असेच एकदा एका adoption centre ने ब्राउन कलरचे निळसर डोळे असलेले पिल्लू चा फोटो पाठवला. आणि तो फोटो पाहून सर्व त्या पिल्लाच्या प्रेमातच पडले आणि ते पिल्लू घरी आणायचे ठरले. दुसऱ्या दिवशी अहो घरातील एक मुलाच्या लहानपनीची बास्केट घेऊन त्यात जुन्या बेडशीट टाकून त्या पिल्लाला उबेर ऑटोने सांगितलेल्या लोकेशन ला गेले. तिथे ते पिल्लू एका लेडी ने जड अंतःकरणाने दिले आणि पाणावलेल्या डोळ्यांनी आहोला सांगितल
े हिला नीट सांभाळा, काळजी घ्या आणि अहो पिल्लाला घेऊन घरी आले. अश्याप्रकारे पिल्लू आमच्याकडे आले.
ते खुप निरागस, एक महिन्याचे पिल्लू घाबरलेल्या अवस्थेत आमच्या घरी आले.. आणि ते पिल्लू आल्यावर त्याला आम्ही प्रथम पाणी टाकून गाईचे दूध दिले कारण ते काय खाते पिते हे आम्हाला माहित नव्हते. आणि ते थोडे दूध पिले त्याचे नाव मुलांनी कोको ठेवले. ते दूध पिऊन उडया मारून बास्केट मध्येच झोपले आणि झोपल्यावर त्याच्या अंगावर हात फिरवताना लक्षात आले की त्याच्या अंगावर किडे आहेत.. मग अहो तिला घरीच ठेऊन veternary डॉक्टर कडे गेले. त्या डॉक्टर नी एक पेटची पॉवडर लिहून दिली. तिला फक्त पेट फूड जे मिळते तेच द्या असे सांगितले. आणि सु शी साठी तिला sand box आणला..
आणि अहो येईपर्यंत आमचा कोको उठला ते कॅट फूड खाल्ले आणि त्याला sand box दाखवला तर त्यातच शी सु केली. इतका गुणी कोको त्याने कधीच सु शी बाहेर केली नाही. मुल त्याच्या शी खेळण्यात गुंतले.. आणि आता मुलांचा स्क्रीन टाइम कमी होणार ह्याची खात्री पटली. नंतर आमचा कोको active झाला. घरात ह्याच्या त्याच्यावर चढायला लागला. कॉट खाली जायला लागला. तिथून परत येऊन मांडीवर येऊन बसू लागला.
पण मला मी आधीच सांगितल्याप्रमाणे फोबीया आहे. मी सोफ्यावर फोन वर बोलत असताना माझ्या अंगावर चढला मी फोन फेकून जोरात किंचाळली.मुलांनी तिला माझ्याजवळून दूर नेले. नंतर मी मुलांना सांगितले की हिला मी जिथे बसली तिथे उडया मारू देऊ नका.मुलं मग तेव्हापासून तिला त्यांची रूम किंवा टेरेस ह्या दोनच ठिकाणी ठेऊ लागले आणि मी जेव्हा हॉल मध्ये नसले तेव्हा हॉल मध्ये उडया मारायचे पण मी मॅक्सिमम वेळ हॉल मध्येच असल्यामुळे दोन ठिकाणीच त्याला ठेवावे लागे. त्याला झोपवताना मुलं डोक्यावर हात फिरवत तर तो पटकन झोपी जायची. कधी कधी स्वतःच बास्केट मध्ये जाऊन झोपी जायचा . त्याला एक बॉल, टेडी, wire खेळायला दिले त्याच्याशी खेळत असे. आणि जसे दार उघडले तसे सुसाट घरात पळायची. मी कितीही घाबरले तरी तिचा निरागस चेहरा पाहून प्रसन्न वाटायचे.पहिल्या दिवशी तिला मुलांच्या रूम मध्ये बास्केट मध्ये झोपवले पण ती रात्री उठून मुलांच्या कॉट वर चढायची म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी ठरवलं की त्याला terrace वर झोपवायचे terrace आमची close असल्यामुळे कुठे जाऊ शकत नव्हती. ती terrace वर मॅऊ मॅऊ करून स्वतःच खेळून sand box मध्ये शी सु करून झोपी जायचे. असे गुणी कोको त्याला बंधन नको होती पण तरी तो कोंडल्यासारखा दोनच रूम मध्ये राहायचा मुलांच्या वेळे नुसार त्यांच्याशी खेळायचा नाहीतर एकटाच खेळायचा. त्याला आपण कोंडून ठेवतो त्याचे स्वातंत्र्य हिरवतो असे मला आणि आहोला वाटले आणि आठ दिवसानंतरच त्याला आम्ही एकाला देऊन टाकले ते जिथे गेले तिथे बिनधास्त खेळते पण ते गेल्यावर अजूनही त्याची खुप आठवण येते. माझी मुलगी तर अजूनही रडते. पण मला कोको मुळे कळले की पाळीव प्राणी खुपच निरागस असतात. मी ती असतांना माझा फोबीया घालविण्याचा खुप प्रयत्न केला पण तो निरर्थक ठरला..पण तरीही मला त्याची खुप आठवण येते.
ह्या lockdown मध्ये प्राणी किती प्रेमळ असतात हे शिकायला मिळाले तसेच मी मनाशी ठरवलं की माझ्या मनातून प्राण्यांचा phobea काढायचा आणि प्राण्यांनाही जीव लावायचा...