कडू कारले कडू ते कडूच
कडू कारले कडू ते कडूच


असे म्हणतात कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच असते. तसेच काही लोकांचा स्वभाव असतो तो बदलू शकत नाही. अशीच सिंधुची गोष्ट. सिंधू एक गरीब घरातील एकुलती एक मुलगी असते. तिचे वडिलांचा लहानपणीच मृत्यू होतो. मोठ्या कष्टाने आई तिला मोठे करते. खुप लोकांचे वाईट अनुभव तिला येतात. त्यामुळे तिला सर्व लोक वाईटच वाटतात. सर्व लोक आपला फायदाच घेतात असा तिचा समज होतो. म्हणून तिचा स्वभाव सर्वांवर वर्चस्व करून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा होतो.कालांतराने तिचे लग्न समाधानशी होते. सासरचीही परिस्थिती ठीक ठाकच असते.थोडी फार त्यांची शेती असते.तिथे एकत्र कुटुंब असते. त्यात ती सासू, सासरे, दोन दीर असे कुटुंब असते. हीच सर्वात मोठी असल्यामुळे सर्वांचे लग्न राहीलेले असतात.
ही लग्न झाल्यावर सर्व घराची जबाबदारी घेते.शेतीची कामे, त्याचा व्यवहार स्वतःच्या हातात घेते आणि सर्वांना हाताखाली ठेवते. सासू सासऱ्यांना गृहीत धरून सतत भांडण करते. दीर ह्यांच्यासोबतही भांडते. सर्व तिच्या भांडणाला घाबरतात आणि कुणी तिच्या नादी लागत नाही. कालांतराने दिराचे लग्न होते.दिरांना वेगळे काढून देऊन शेती सर्व मिळून असल्यामुळे किराणा भरून देते. बाकी सर्व व्यवहार स्वतःच करते. दीर तेव्हड्यात भागत नाही म्हणून दुसरीकडे नौकरी शोधतात एक पेपर वाटण्याचे काम करतो तर दुसरा दवाखान्यात वॉर्ड बॉय चे काम करतो.समाधान तिला काही बोलत नाही कारण त्यालाही वाद नको असतात.
पण तरीही सिंधुला आपले अस्तित्व दाखवायचे असते म्हणून दिरांच्या बायकांच्या चुका दाखवून तुम्हाला आम्ही घरात लग्न करून आणून किती उपकार केले असे सांगून भांडते.तिची अपेक्षा असते की ह्या बायकांनी त्यांच्या घरात ही मला विचारून काम करावीत. पण असे होत ना
ही.आधी त्याही तिच्याशी भांडतात पण नंतर त्या दुसरीकडे घर घेऊन राहतात.
सिंधू तिथेही त्यांच्याशी भांडते. शेवटी दीर तिला सांगतात आमच्या घरी येत जाऊ नका.
सिंधुला दोन मुली असतात. एक निशा आणि दुसरी दिशा.निशा बँकेत नौकरी करते. तिचा नवराही बँकेत असतो. तिचे सासू सासरे तिच्या सोबत राहतात. तरसिंधू सारखी फोन करून तिच्या सासू सासऱ्यांशीही फोन करून भांडते. पण त्या मुलीला एक मुलगी असते जॉब करत असल्यामुळे तिला सासू सासरे घरी असल्यामुळे घरचे टेन्शन नसते. सिंधुच्या भांडणाला कंटाळून त्यांच्या गावी जाण्याचा निर्णय घेतात कारण सिंधू त्यांना म्हणते की माझी मुलीला जॉबही करावा लागतो तुम्हालाही सांभाळावे लागते तुम्ही इथे का राहता?सासू सासरे गावी गेल्यावर निशा तिच्या आई बाबाला म्हणजे सिंधू आणि समाधानला बोलवूब घेते. पण इथे तिला वाद घालता येत नाही दिवसभर फक्त मुलीचे करून राहावे लागते म्हणून ती घरी परत जाण्याचा निर्णय घेते. मुलगी तिला विनवण्या करते पण राहत नाही.
आता निशाला सासू सासऱ्यांचे महत्व समजते म्हणून निशा त्यांना माफी मागून परत आणते आणि आईला सांगते आता माझ्या सासू सासऱ्यांना अजिबात फोन करायचा नाही.
तर दिशा घरून केक चा बिझनेस करते आणि तिचा नवरा खाजगी शिक्षक असतो.दिशाचे सासू सासरे तिच्याकडे राहत नाही. पण सिंधू दिशाच्या नवऱ्याशी भांडते की तुमची नौकरी चांगली नाही त्यामुळे माझ्या मुलीला एव्हडी मेहनत करावी लागते पण दिशा तिला ठणकावून सांगते की माझी आवड म्हणून मी हे करते तु बिलकुल बोलायचं नाही.
अश्याप्रकारे शेवटी सिंधू आणि सोबत समाधानही एकटे पडतात. त्यांना लोक टाळू लागतात.
असे म्हणूनच म्हणतात कडू कारले तुपात घोळले साखरेत तळले तरी कडू ते कडूच...