स्वतःची ओळख आणि संस्कार
स्वतःची ओळख आणि संस्कार
रमानी सर्वांच्या इच्छेचा आदर करून नौकरी न करता अबॅकस आणि वैदिक गणिताचे क्लासेस सुरु केले. रमाला दोन मुलं असतात. एक मुलगी रावी सहावीत असते तर मुलगा रुद्र दुसरीत असतो. सकाळी उठून दोघांचे आवरून त्यांना दोन दोन टिफिन देते. एक टिफिन शॉर्ट ब्रेक साठी आणि दुसरा लॉन्ग ब्रेक साठी देते. तसेच तिचा पती दिनेश त्यालाही टिफिन देते. नंतर आठ वाजता दिनेश ऑफिसला जातो. रमा मुलांना शाळेत सोडते. घरची सर्व काम आटोपते. तीन वाजेपर्यंत परत मुलांना घेऊन येते. मुलांना काहीतरी खायला प्यायला देऊन त्यांना अभ्यासाला बसवते.
चार वाजता तिच्या कलासेस ची वेळ होते. तिच्याकडे जवळपास तीस ते चाळीस मुलं असतात. त्यामुळे रोज चार ते सात बॅचेस पाडून ती क्लासेस घेते.कधी कधी सासू सासरे एक महिन्यासाठी तिच्या घरी रहायला आले तरी तिचे हेच शेड्युल असते. तेव्हा तिची सासू मुलांना शाळेतून आल्यावर खायला प्यायला देते.ती रमाला म्हणते अगं रमा मुलं घरी दमून आल्यावर त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यांना काय पाहिजे नको ते बघाय
ला पाहिजे. तु जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा क्लासेस का नाही घेत?
तेव्हा रमाला वाईट वाटते ती चिडण्याच्या स्वरातच सासूबाईंना सांगते की सकाळी सर्व मुलांची शाळा असते तर मी त्यावेळेत कसे क्लास घेऊ शकते? मी आधी नौकरी करण्याचा निर्णय घेऊन तुम्हाला मुलं सांभाळायला बोलावले होते तर तुम्ही चक्क मम्हणाल्या होत्या की मुलं मी सांभाळेल गं. पण त्यांना आईचे संस्कारच आवश्यक असतात. तर मी तुमचे ऐकून नौकरी केली नाही पण माझ्याही शिक्षणाचा काही उपयोग झाला पाहिजे. मलाही स्वतः चे अस्तित्व असायला पाहिजे म्हणून मी आता हे करते. तर तुम्हाला तेही पटत नाही. तर तुम्हाला मी स्पष्टच सांगते, "मी तुमच्या सांगण्यावरून आता माझे क्लासेस बंद करणार नाही. माझ्या मुलांच्या संस्काराची जबाबदारी माझी आहे ना, मग मी बघू शकते की मी जेव्हा क्लास मध्ये असते तेव्हा ते कसे इंडिपेंडेन्ट काम करतात. ते स्वतःचा अभ्यास करतात. काही लागले तर हातानी घेतात. हा एक संस्कारचाच भाग आहे.प्रत्येक स्त्रीने स्वतः ची ओळख निर्माण करायलाच हवी.