जागा
जागा


फार वर्षांपूर्वी अकोल्यात अकोलसिंग नावाच्या राजाचे राज्य असते. अकोलसिंग राजाची पत्नीची महादेवावर खुप भक्ती असते. ती रोज रात्री बारा वाजता राजवाड्यातून बेल, फुले, पाणी, दुध याचे ताट घेऊन राजेश्वराच्या मंदिरात पूजेला जाते. ती राजाला तसे सांगते. पण एक दिवस अकोलसिंग राजाच्या मनात संशय येतो कि खरच ही एव्हडया रात्री पूजेला जाते कि अजुन कोणत्या जागी जाते म्हणून राजा एकदा तिचा पाठलाग करत सैन्य आणि तलवार घेऊन तिच्या मागे मागे जातो. राणी डोळे मिटून पुजा करत असते. जेव्हा डोळे उघडते तेव्हा तिला सैन्यासोबत राजा दिसतो. तिला वाईट वाटते कि आपल्या पतीचा आपल्यावर विश्वास नाही. ती महादेवाला प्रार्थना करते कि हे महादेवा मी तुझी मनोभावे भक्ती केली असेल तर मला तुझ्यात सामावून घे. एव्हड्यात मोठा आवाज होऊन महादेवाची पिंडीला मोठा तडा पडतो आणि त्यात राणी सामावून जाते. परत ती पिंड बंद होते. अशी ही कथा प्रचलित असल्यामुळे अजूनही त्या पिंडीला तडा जाऊन त्यात राणी समावल्याने ती भेग दिसते.
या मंदिरात भाविकांची खुप गर्दी असते. बेल, फुले, दुग्धभिषेक ही केल्या जातो.