SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

होळी

होळी

2 mins
202


होळीची एक कथा प्राचीन काळापासून प्रचलित आहे.हिरण्यकश्यपु नावाच्या राक्षसाने चहूकडे दहशत निर्माण केली होती. त्याला एक मुलगा असतो. त्याचे नाव प्रल्हाद असते. प्रल्हाद लहानपणा पासूनच विष्णुची भक्ती करतो.तो सतत नारायण नारायण चा जप करत असतो. हिरण्यकश्यापुला ते बिल्कुल आवडत नाही. तो मुलाला आधी समजविण्याचा प्रयत्न करतो कि तु विष्णूची भक्ती नको करुस माझी भक्ती कर कारण तिन्ही लोकात मीच सर्वश्रेष्ठ आहे.पण प्रल्हाद काही त्याचे ऐकत नाही.मग तो त्याला मारहाण करतो. तरीही प्रल्हाद ऐकत नाही. प्रल्हाद फक्त पाच वर्षाचाच असतो. तो त्याच्या वडिलांनी कितीही रागावले धमकावले तरी विष्णुची भक्ती करणे सोडत नाही. मग हिरण्याकश्यपु त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करतो. कधी प्रल्हादला विष देतो त्यातुन तो वाचतो. अजुन वेगवेगळ्या प्रकारे मारण्याचा तो प्रयत्न करतो पण सर्व प्रयत्न असफल होतात.हिरण्यकश्यपुची बहीण होलिका असते. तिला अग्नीने न जळण्याचे वरदान असते. होलिका हिरण्याकश्यपुला सांगते कि प्रल्हाद ला माझ्या मांडीवर बसव आणि आग लाव. मला वरदान असल्यामुळे मी तर अग्नितुन सुरक्षित निघेल पण प्रल्हाद ची राख होईल. ठरल्याप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होलिका प्रल्हाद ला मांडीवर घेऊन बसते. प्रल्हाद डोळे मिटून विष्णुचाच जप करत असतो. आग लावल्यावर प्रल्हादच्या भक्तीमुळे होलिकाची जळून राख होते पण प्रल्हाद सुरक्षित बाहेर निघतो. तेव्हापासून होळीची प्रथा पडली अशी यामागची कथा आहे.


म्हणूनच होळी म्हणजे वाईट प्रवृत्तीचा नाश करणे. तर आधी गावाकडे होळीच्या पंधरा दिवस आधी शेणाच्या वेगवेगळ्या आकाराच्या चाकोल्या बनवत. त्याला सुकवत. त्याची माळ करत आणि त्याची होळी पेटवत.होळीच्या निमित्ताने सर्व लोक एकत्र येत. प्रत्येकाच्या घरी स्वतंत्र होळी पेटत नाही.तर एक सोसायटी किंवा एका एरिया मध्ये एकच होळी पेटते. त्यात कापूर, तुप जाळतात त्यामुळे वातावरण शुद्ध होते. तसेच त्यात नारळ टाकतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो ते भाजलेले नारळ खुप स्वादिष्ट लागते. अश्याप्रकारे वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते.


Rate this content
Log in