SWATI WAKTE

Abstract Others

4.0  

SWATI WAKTE

Abstract Others

कुटुंब

कुटुंब

3 mins
223


अनिता आणि मनोज लग्नानंतर लगेच मनोजला जास्त सुट्टी नसल्यामुळे त्याच्या नौकरीच्या गावात म्हणजेच मुंबईला जातात.अनिता नौकरीच्या शोधात असते तर मनोजची नविन नौकरी असते. काही तात्पुरते सामान जी लग्नात भांडी गिफ्ट म्हणून येतात ती ते घेऊन येतात आणि इथे अनिताच्या लक्षात येते कि ही भांडी स्वयंपाकाला पुरेशी नाहीत. म्हणून अजुन लागणारी भांडी ते दोघे विकत घेतात. घर आवरण्यात भांडी घेण्यात पंधरा दिवस निघून जातात. पंधरा दिवसांनी अनिताचे सासू सासरे म्हणजेच मनोजचे आईवडील त्यांच्याकडे येतात. अनिता तोपर्यंत मनोजला ऑफिसला वेळेवर डब्बा, नाश्ता हे सर्व करण्यात स्थिरावली असते.

अनिता सासू सासरे आल्यावर मनोजचा डब्बा दिल्यावर सासू सासऱ्यांच्या वेळेनुसार त्यांचा स्वयंपाक करते. हे सर्व दोन तीन दिवस तिची सासू तिथे आल्यावर बघते. ही मनोजला सर्व वेळेवर देते आपलेही वेळेवर करते पण सासू म्हणून आपला काही सल्ला घेत नाही. तर एकदा सासू तिच्याशी बोलते. ती कशी सासू सासऱ्यांची आज्ञा पाळायची. कसा तिनी तीस वर्ष संसार केला. अनिता ही उत्सुकतेने ऐकते. तिची संसाराची सुरवातच असल्यामुळे सासू जे सांगत होती ते तिला ग्रेट वाटते.तिला सासूचा आदर वाटतो. मग दुसऱ्या दिवशी परत काम आवरल्यावर तिची सासू तिच्याजवळ येते आणि अनिताला म्हणते, "अगं अनिता तु उठल्यावर मनोजला फक्त नाश्ता आणि डब्बा देते. बाकी काहीच बघत नाहीस. अगं तु घरीच असते ना त्याचे सॉक्स आणि रुमाल हातात देत जा. त्याची सकाळी तयारी करून ते घेण्यात किती वेळ जातो. अनिता ला वाटते खरच आपले चुकते आपण दिवसभर घरीच असतो आपण मनोज दिवसभर काम करून दमतो. आपण द्यायला पाहिजे.ती दुसऱ्या दिवशीपासून मनोजला सॉक्स आणि रुमाल आवरल्यावर हातात देते.


मग परत तिची सासू दुपारी तिला म्हणते., अनिता मनोज सकाळी ऑफिस मध्ये जातो तेव्हा तु त्याला दरवाज्याच्या बाहेर सोडवायला का जात नाही? अगं तेव्हडेच नवऱ्याला बरं वाटते. तुझे बाकी काम का होत राहतील. तु घरीच असते ना नंन्तर दिवसभर. अनिताला वाटते आपली सासू किती ब्रॉड माईण्डेड आहे. ती घरात असून देखील नवऱ्याला सोडायला जायला पाहिजे असे वाटते. ती हो म्हणून दुसऱ्या दिवशी मनोजला सोडायला बाहेर जाते.


नंन्तर परत दुपारी सासू गप्पा मारायला येते. अनिता तु दुपारी अशी झोपतेस. त्यावेळेत तु मनोजचे कपडे करू शकतेस किंवा इतर घरातील बाकीचे काम असतात ती करू शकते. आता थोडे अनिताला वाईट वाटते. कारण सकाळपासून घरची सर्व काम धुनी, भांडी, स्वयंपाक करून दुपारी झोपेची तिला गरज असते. पण तरीही ती सासूला होला हो लावते. नंन्तर शेजारची तिच्या सासूच्याच वयाची बाई सासूशी गप्पा मारायला येते तेव्हा अनिता तिच्यासाठी खायला प्यायला करते. अनिताची सासू त्या बाईजवळ सांगते अनिताला मी शिकवले कि तु घरीच असते तर मनोजला ऑफिस ला जाईपर्यंत जाईपर्यंत काय हवे नको ते हातात द्यायला पाहिजे. त्याला बाहेर सोडायला पाहिजे. दुपारी झोपा न काढता काम करायला पाहिजे. हे ऐकून अनिताचा पारा चढतो ती तिच्या सासूला त्या बैसमोरच म्हणते मी तुमचे सर्व ऐकत आहे ना मग तुम्ही दुसऱ्यासमोर उजळणी का करता? त्या बाई समोर अनिताने आपला अपमान केला असे तिच्या सासूला वाटते. ती मनोजला सांगते कि अनिता खुप उद्धट आहे. मनोजही अनितालाच बोलतो कि मोठ्यांचा मान राखत जा. अनिताला ह्या गोष्टीचा खुप राग येतो.


आता पूर्णपणे सासू तिच्या नजरेतून उतरते. एक महिना राहून सासू सासरे गावाला निघून जातात. अनिता कधीही स्वतःहुन त्यांना फोन करत नाही. तिला कोणताच त्यांच्याबद्दल आदर वाटत नाही.कुटुंबात जर नविन व्यक्ती आली तर तिला समजून घेणे घरच्यांचे कर्तव्य असते पण सुरवातीलाच तसे झाले नाही तर ते कुटुंब कधीच एक होऊ शकत नाही...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract