अव्यक्त प्रेम
अव्यक्त प्रेम


अव्यक्त प्रेमसई एक लाजरी बुजरी मुलगी असते.ती जास्त कुणाशी बोलत नाही. कोणात मिसळत नाही. सई इंजिनीरिंग फर्स्ट इयर ला कॉलेज मध्ये जाते. पहिल्या दिवशी तिच्या दोन मैत्रिणीसोबत जाते. त्या तिच्या मैत्रिणी खुप बोलक्या असतात. सई मात्र स्वतःच्याच कोषात राहणारी असते. तिच्या मैत्रिणी सर्वांशी स्वतःहुन ओळख करून घेतात. सई मात्र जो तिच्याशी बोलेल त्याच्याशी तेव्हड्या पुरतेच बोलते. असेच एकदा तिच्या त्या मैत्रिणी म्हणजे राधा आणि कल्याणी एका सिनियर मुलाशी बोलत असतात. राधाही तिथेच असते. त्या मुलाचे नाव अमेय असते. तो खुप हँडसम आणि बोलका असतो. सई बघता क्षणी त्याच्या प्रेमात पडते. राधा आणि कल्याणी जेव्हा त्याच्याशी बोलतात. ही फक्त एकटक त्याच्याकडे बघते.
तेव्हड्यात अमेय राधा आणि कल्याणीला विचारतो ही कोण आहे. राधा आणि कल्याणी म्हणतात, "ओ, सॉरी आम्ही आमच्या मैत्रिणीची ओळख करून द्यायला विसरलो ही आमची मैत्रीण सई आहे." अमेय सईला, "हाय " म्हणतो. तीही त्यालाहाय म्हणते. तो त्यांनतर तिला बरेच प्रश्न विचारतो जसे कोणत्या कॉलेज मधून आली. कुठे असते.सई सर्व अमेयने जेव्हडे प्रश्न विचारले तेव्हड्याच प्रश्नाची उत्तरे देते. त्याला स्वतः काहीच विचारत नाही. पण सईला अमेय एव्हडा हँडसम मुलगा आपल्याही बोलला याचा खुप आनंद होतो. ती रात्रभर आनंदाने झोपत नाही अमेयचाच चेहरा तिच्या डोळ्यासमोर येतो. पुढे नेहमी कल्याणी आणि राधा यांची त्याच्याशी घट्ट मैत्री होते. सई सोबत असते म्हणून तीही त्यांच्यासोबत सगळीकडे फिरते. पण ती अमेय शी स्वतः हुन कधीच बोलत नाही. अमेय मात्र आवर्जून तिच्याशी बोलतो. ती कधी अनेयचा फोन नंबर ही घेत नाही. अमेयला वाटते सई ला आवडणार नाही म्हणून तोही तिला कधी मागत नाही.
कॉलेज च्या पंधरा दिवसांनी राधा आणि कल्याणी ला दुसऱ्या चांगल्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळते म्हणून त्या ते कॉलेज
सोडतात. सई मात्र इथेच असते. अमेय शेवटच्या वर्षाला असतो. राधा आणि कल्याणीने कॉलेज सोडल्यावर कल्याणी जी आहे तिला अमेय आवडू लागतो. कल्याणी दुसऱ्या कॉलेज मध्ये गेल्यावर अमेयला मिस करते. म्हणून एक दिवस कल्याणी एक पत्र अमेयला देते. आणि ते साईजवळ देते. तिला अमेय ला द्यायला सांगते. सईला वाईट वाटते. पण पत्र देण्याच्या निमित्ताने अमेयशी भेट होईल याचा तिला आनंद होतो. अमेयला बघताच ती त्याच्याशी काही बोलणार तितक्यात अमेयचं हाय करून तिच्याशी नेहमीसारखा एकटाच बोलतो. सई फक्त ऐकते आणि विचारल्या तेव्हड्या प्रश्नाची उत्तर देते.. शेवटी सई त्याला कल्याणीने दिलेले पत्र देते. अमेयला काय बोलाव कळतं नाही. तो पत्र घेऊन तिथून लगेच निघून जातो. पत्र वाचून तो अस्वस्थ होतो. तो दुसऱ्या दिवशी कल्याणीला भेटायला तिच्या कॉलेज मध्ये जातो आणि माझ्या मनात तुझ्याविषयीं असे काही नाही सांगतो.दुसऱ्या दिवशी सई त्याला कॉलेज मध्ये भेटते. नेहमीप्रमाणे तो एकटाच बोलतो.
सईला त्याच्याशी बोलायला भेटायला चांगले वाटते. पण तिच्या लाजाळू स्वभावामुळे ती कधीही स्वतः हुन त्याच्याशी बोलत नाही. ती रोज अमेय दिसण्याची वाट बघते. तो भेटला कि तिला खुप चांगले वाटते. असे करून एक वर्ष संपते. सई जरी सेकंड इयर जाणार असली तरी अमेयचे शेवटचे वर्ष असल्यामुळे तो कायमचा कॉलेज सोडून जाणार असतो. तो तिला शेवटच्या दिवशी भेटतो आणि सांगतो कि आता मी परत कधीच या कॉलेज मध्ये येणार नाही. तिच्याशी एक तास तो बोलतो. सईची इच्छा असते कि अमेयने तिला प्रोपोज करावं. किंवा मी माझ्या मनातले त्याला सांगावे. पण असे काहीच होत. अमेय संगेवटचे बाय करून उच्चं शिक्षणासाठी अमेरिकेत निघून जातो. त्यानंतर सईला त्याची खुप आठवण येते. पण तिला त्याच्या मनात तिच्याविषयी जागा आहे कि नाही हेही माहिती नसते. त्यांनतर आयुष्यात ते दोघे कधीही भेटत नाही. पण सईचे पहिले प्रेम अव्यक्तच राहते.